T20 World Cup 2022 : ICC तिकीट विक्रीचा आकडा 5 लाख पार; भारत-पाकिस्तान मिनिटात 'हाऊस फुल'!

in #t202 years ago

T20 World Cup 2022 India Vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भिडणार आहेत. हा हाय व्होल्टेज सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगणार आहे. दरम्यान, आज आयसीसीने या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे अतिरिक्त स्टँडिंग रूम तिकिट देखील काही मिनिटातच संपल्याचे आयसीसीने सांगितले. आयसीसीने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी जवळपास 5 लाखाच्या वर तिकिटे विकली असल्याचे सांगितले.

हेही वाचा: Shoaib Akhtar Virat Kohli Retire : भाऊ तू निवृत्ती घे! आफ्रिदीनंतर पाकचा अख्तरही बरळला!

आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 'आयसीसी पुरूषांच्या टी 20 वर्ल्डकप 2022 साठी सर्व वयोगट आणि पार्श्वभूमीच्या चाहत्यांचे स्वागत करण्यास सज्ज झाले आहे. आम्ही या स्पर्धेसाठी अजून एक महिना शिल्लक असताना देखील जवळपास 5 लाखांपेक्षा जास्त तिकिटे विकली आहेत.' आयसीसी पुढे म्हणते, '82 देशातील चाहत्यांनी टी 20 क्रिकेट वर्ल्डकपचा आस्वाद घेण्यासाठी तिकिटे खरेदी केली आहेत. या स्पर्धेत 16 आंतरराष्ट्रीय संघ सहभागी होणार आहेत. 2020 ला झालेल्या महिला टी 20 वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेमध्ये स्टेडियमच्या पूर्ण क्षमतेने प्रेक्षक उपस्थित असणार आहेत. एमसीजीवर होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी जवळपास 86 हजार 174 प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 'भारत पाकिस्तान सामन्याबाबत आयसीसी म्हणते, '23 ऑक्टोबरला एमसीजीवर होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याची देखील सगळी तिकिटे विकली गेली आहे. अतिरिक्त स्टँडिंग रूम तिकीट देखील काही मिनिटात संपली. सामन्याच्या आधी काही दिवस अधिकृत तिकीट पुनःविक्री सुविधा देखील सुरू करण्यात येणार आहे, जेथे चाहते आपले तिकीट विकू शकतील.'
RECOMMENDED ARTICLES

SAR Value Code : मोबाईल आरोग्यासाठी घातक आहे हे कसं मोजाल?
शंभरातच एखादा व्यक्ती असतो जो हँडसेटची SAR व्हॅल्यू तपासतो. पण काही जणांना तर SAR व्हॅल्यू म्हणजे काय हे देखील माहीत नसतं. या लेखातून SAR व्हॅल्यूची माहिती जाणून घ्या, आणि दिवसरात्र तुमच्या खिशात असणारा फोन तुमच्यासाठी किती घातक आहे याची माहिती घ्या.
5 hours ago

Cholesterol : शिरांमधील खराब कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी सोपा उपाय; 'हा' पदार्थ दररोज खा!
भारतात कित्येक लोक हृदयविकाराच्या आजाराला बळी पडत आहेत. अलिकडच्या वर्षांत हा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. देशात कार्डिओ व्हॅस्कुलर डिसीज (CVD) मुळे मृत्यू होण्याच्या संख्येतही वाढ झाली आहे. हृदयविकारामुळे 20 ते 40 वयोगटातील लोकांनाही या काळात जीव गमवावा लागला आहे, अशी आश्‍चर्यकारक माह
5 hours ago

Relationship: पत्नी समोर चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी
पती पत्नी एकमेकांना समजून घेतात. आणि नात्याची विन घट्ट करण्याचा प्रयत्न करतात.
5 hours ago
Farmer : कर्जबाजारी भारतीय शेतकरी नोकरीसाठी पोहचला UAE मध्ये अन्...
लॉटरी ही अशी गोष्ट आहे जी कधीही कोणत्याही व्यक्तीचे नशीब बदलू शकते. असाच काहीसा प्रकार दुबईत काम करणाऱ्या एका भारतीय शेतकऱ्यासोबत घडला. हा शेतकरी दुबईत त्याच्यावर असणारे कर्ज फेडण्यासाटी नोकरी करत होता.
5 hours ago
हेही वाचा: Yuzvendra Chahal : मस्त चाललंय आमचं! चहलने रोमँटिक VIDEO शेअर करत ...

दक्षिण आफ्रिका विरूद्ध बांगलादेश याचबरोबर भारत आणि ग्रुप A मधील उपविजेता सामन्यांच्या तिकिटे संपली आहेत. असे असले तरी अतिरिक्त तिकिटे देखील लवकरच उपलब्ध होणार आहेत. आयसीसीने सांगितले की, 'सुपर 12 मधील ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड या पहिल्या सामन्याची थोडीच तिकिटे शिल्लक आहेत. याचबरोबर पाकिस्तान विरूद्ध ग्रुप A उपविजेता. भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान विरूद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यांची देखील थोडीच तिकिटे शिल्लक आहेत.esakal_new___2022_09_15T155247_115.jpg