चांगलं गोमांस कुठे मिळतं?';अग्निहोत्री म्हणाले, 'मला विचारा',व्हायरल व्हिडीओनं खळबळ

in #sumit2 years ago

Untitled_design___2022_09_08T175826_054.jpgVivek Agnihotri On Beef: अभिनेता रणबीर कपूर(ranbir Kapoor),आलिया भट्ट आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी मिळून एकदम जोरदार ब्रह्मास्त्रचे प्रमोशन करत आहेत. एकीकडे सिनेमाला लोकांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे, तर दुसरीकडे ब्रह्मास्त्रला बॉयकॉट करण्याच्या मागे लोक हात धुवून लागले आहेत. रणबीर कपूरचा गोमांस विषयी वादग्रस्त वक्तव्य केलेला जुना व्हिडीओ व्हायरल केला गेला आणि ब्रह्मास्त्रला बॉयकॉट करण्यामागे हेच कारण अशी ओरडही केली गेली. याच व्हिडीओमुळे उज्जैन येथे गेल्यावर रणबीर आणि आलियाला महाकाल बाबा मंदिरात दर्शनासाठीही जाऊ दिलं गेलं नाही. काही दिवस आधी काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील ब्रह्मास्त्रवर आपली प्रतिक्रिया दिली होती. यात त्यांनी भले टीका केली असेल तरी अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनाची प्रशंसा देखील केली होती. आता त्यानंतर विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे,ज्या व्हिडीओत ते आपल्याला गोमांस आवडतं असं बोलताना दिसत आहेत.(Vivek Agnihotri old video confessing as he eats beef goes viral amid brahmastra boycott