Vastu Tips ; धातूच्या कासवाने घरात सुख-समृद्धी येते,जाणून घ्या ते ठेवण्याचा योग्य नियम

in #sumit2 years ago

esakal_new___2022_09_17T082722_511.jpgलहान धातूच्या कासवाचे वास्तुशास्त्रात विशेष महत्त्व आहे. घरात धातूचा कासव ठेवल्याने घरात सकारात्मकता राहते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्यामुळे घरात सुख-समृद्धी येते. वास्तूशास्त्रात लहान धातूच्या कासवाचे विशेष महत्त्व मानले गेले आहे. हे कासव स्फटिक, तांबे किंवा चांदीसारख्या धातूंनी बनवलेले असावे. असे मानले जाते की ज्या घरात हे कासव असते त्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते. ऑफिस किंवा दुकानात ठेवल्याने खूप प्रगती होते आणि व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता कमी असते. शास्त्रानुसार घरामध्ये कासव ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवनातील सर्व समस्या दूर होतात