केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा जवान बंदूक आणि जिवंत काडतुसांसह गायब

in #sumit2 years ago

klds.jpgमनोर - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा एक जवान बंदूक आणि जिवंत काडतुसे घेऊन गायब झाला आहे. शुक्रवार दुपार पासून जवान मनोज यादव गायब असून त्याच्या ताब्यात रायफल आणि तीस जिवंत काडतुसे असल्याची माहिती समोर येत आहे. तारापूरच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या अणुऊर्जा केंद्र आणि भाभा अनुशक्ती केंद्राची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाकडून सांभाळली जात आहे.केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आणि महाराष्ट्र पोलीसांकडून जवानाचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.या घटनेमुळे तारापूर परिसरातील राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील प्रकल्पांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात कार्यरत असलेला जवान मनोर यादव गुरुवारी (ता.01)दुपारी तारापूर अणु