Pune : कात्रज जुना बोगदा धोकादायक; पण बांधकाम विभागाला पत्ताच नाही!

in #sumit2 years ago

333333333333.jpgपुणे : अनेक ठिकाणी पावसाचे गळणारे पाणी, रस्त्यावर पडलेले खड्डे, निसरडा झालेला रस्ता आणि बोगद्याच्या दोन्ही बाजूला जमा झालेला चिखल आणि राडारोडा... अशी अवस्था सध्या कात्रजच्या जुन्या बोगद्याची झाली आहे. या अशा अवस्थेमुळे कात्रज जुन्या बोगद्यातील प्रवाशांचा प्रवास धोकादायक झाला आहे. अन् विशेष म्हणजे बोगद्याची ही दुरवस्था सार्वजनिक बांधकाम विभागालाच माहीत नसल्याचे दिसून येते.