राजलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेने केला कर्मचाऱ्यावर अन्याय

in #rajalakshmi2 years ago

IMG-20220705-WA0038.jpg

पतसंस्थेला दिले होते रुजु करण्याचे आदेश

यवतमाळ -: येथील राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या मुख्य शाखेमध्ये कर्मचारी रवि बाबाराव कुथे हे शिपाई पदावर सन 2011 पासून कार्यरत होते,मात्र त्यांना दिनांक 26 सप्टेंबर 2018 रोजी सेवा समाप्तीचे पत्र देऊन नोकरीवरून टर्मिनेट केले. यामुळे त्यांच्यावर हा अन्याय झाला या अनुषंगाने शिपाई रवि कुथे हे राजलक्ष्मी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या विरोधात औद्योगिक न्यायालयात गेले.अखेर औद्योगिक न्यायालयाने शिपाई रवि बाबाराव कुथे यांच्या बाजूने दि. 8 मार्च 2022 ला निर्णय दिला व राजलक्ष्मी मल्टीस्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना रवि कुथे यांना पतसंस्थेच्या मुख्य शाखेत शिपाई पदावर रुजू करण्याचे आदेश दिले.या आदेशावरून शिपाई रवि कुथे हे दि. 4 एप्रिल 2022 पासून पतसंस्थेच्या मुख्य शाखेत रुजू झाले मात्र काही दिवसातच त्यांना 31 मे 2022 रोजी परत राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने सेवा समाप्तीचे आदेश देऊन एक प्रकारे कोर्टाने दिलेल्या आदेशाचा अवमानच केला.यामुळे पतसंस्थेचे कर्मचारी म्हणून रवि कुथे यांच्यावर अन्याय होत असून या अन्यायाविरोधात अखेर त्यांनी लोकशाही दिनामध्ये जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी यवतमाळ यांनी औद्योगिक कोर्ट यवतमाळ यांचा आदेश धुडकवून कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी सदर प्रकरणाची चौकशी करावी अशी न्यायाची मागणी त्यांनी केली आहे.