धक्कादायक! मुंबईत काही हॉटेलांमध्ये विकले जाते कबुतरांचे

in #pusad2 years ago

मुंबई : मुंबईतील काही हॉटेलांमध्ये कबुतराचे मांस दिले जाते या वृत्ताने खळबळ उडाली आहे. मुंबईतील एका रहिवासी सोसायटीच्या इमारतीच्या छतावर कबुतर पाळली जात होती. त्याची वाढ करून ती गुपचूपपणे हॉटेलांना विकली जात होती. एका निवृत्त आर्मी कॅप्टनने दिलेल्या तक्रारीवरून सायन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे.
सायन पोलीस ठाणे क्षेत्रातील श्री नरोत्तम निवास को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीतील हे प्रकरण आहे. या सोसायटीत राहणारे निवृत्त आर्मीचे कॅप्टन हरेश गगलानी (७१) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. इमारतीच्या छतावर कबुतप पाळून ती काही हॉटेलांना पुरवली जातात अशी तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली होती.
हरेश गगलानी यांच्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली आहे. या तक्रारीनंतर सायन पोलीस ठाण्यात आरोपी आणि सोसायटीच्या इतर सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सायन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
असे आले प्रकरण उघडकीस
निवृत्त आर्मी कॅप्टन हरेश गगलानी हे ज्या इमारतीत राहतात, त्याच इमारतीत अभिषेक सावंत नावाची व्यक्ती राहते. सावंत हा कबुतर पाळत असे. सावंतने मार्च २०२२ पासून ते मे २०२२ पर्यंत आपल्या इमारतीच्या छतावर कबुतरांची पिल्लं आणून ती पाळली. त्यांना वाढवल्यानंतर त्याने मुंबईतील काही हॉटेलांना मांसासाठी ती विकली.
तक्रार दाखल करताना निवृत्त आर्मी कॅप्टन गगलानी यांनी काही फोटो पोलिसांना दिले. अभिषेक सावतं कबुतर हॉटेलांना विकण्याच्या कामी आपल्या ड्रायव्हरची मदत घेत असे. सावंत हा आपल्या ड्रायव्हरकरवीच कबुतर मुंबईतील रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये विकत असे.
हरेश गगलानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीचा वॉचमन छतावर पाणी देण्यासाठी जात असे. या वॉचमननेच कबुतरांबाबतची माहिती सोसायटीच्या इतर सदस्यांना दिली. मात्र त्याच्या बोलण्याकडे कोणी विशेष लक्ष दिले नाही. यानंतर पोलिसांनी सोसायटीचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि काही इतर सदस्यांच्या विरुद्ध देखील तक्रार दाखल केली.pigeon-meat-was-being-sold-in-some-hotels-in-mumbai-95806701.jpg