ऋषभ शेट्टीचा 'कांतारा'पाहायचाय? या दिवशी होतोय OTTवर प्रदर्शित

in #pusad2 years ago

मुंबई : ऋषभ शेट्टी याचा कन्नड सिनेमा 'कांतारा' प्रदर्शित झाल्यानंतर तो इतका यशश्वी ठरेल याची कुणालाच अपेक्षा नव्हती. या सिनेमाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील दाद मिळाली. इतकंच नाही तर सिनेमानं बॉक्स ऑफिसवर भरभरून कमाई देखील केली आहे. हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. आता हा सिनेमा लवकरच ओटीटीवरही प्रदर्शित होणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ शेट्टी याचा 'कांतारा' सिनेमा अमेझॉन प्राईमवर २४ नोव्हेंबर २०२२ ला प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा दाक्षिणात्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अर्थात याबाबत निर्मात्यांनी याची अधिकृत घोषणा केलेली नाही.दरम्यान, कांतारा सिनेमा ३० सप्टेंबर २०२२ रोजी कन्नड, १४ ऑक्टोबरला हिंदीमध्ये डब होऊन प्रदर्शित झाला होता. हा सिनेमाची पटकथा ऋषभ शेट्टीनं लिहिली असून त्यानंच हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाचा निर्माता Vijay Kiragandur आणि Chaluve Gowda आहे. हा सिनेमा Hombale Films अंतर्गंत तयार केला असून त्यात ऋषभ शेट्टी याच्यासह Sapthami Gowda, किशोर कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
आयएमडीबीवर सिनेमाला सर्वाधिक रेटिंग
कांतारा सिनेमाला आयएमडीबीवर १० पैकी ९.५ रेटिंग मिळालं आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची मानली जात आहे. कांतारा सिनेमानं केजीएफ २ आणि आरआरआर सिनेमाला मागं टाकलं आहे.kantara-95586656.jpg