पश्चिम रेल्वेचे मुंबईकरांना मोठे गिफ्ट; लोकलची गर्दी कमी करण्यासाठी घेतला मोठा निर्णय

in #pusad2 years ago

मुंबईः पश्चिम रेल्वेने १२ डब्यांच्या २६ लोकलचा १५ डब्यांपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या विस्तारानंतर प्रत्येक लोकलमध्ये २५ टक्के अतिरिक्त आसनक्षमता वाढणार आहे. सोमवार, २१ नोव्हेंबरपासून या गाड्या धावणार आहेत.
१० जलद मार्गावरील गाड्यांचादेखील विस्तार होणार आहे. सध्या १५ डब्यांच्या १०६ लोकल फेऱ्या होतात. सोमवारनंतर या फेऱ्यांची संख्या १३२ होणार आहे, असे पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल फेऱ्यांच्या संख्येत कोणतीही वाढ होणार नाही. सध्या ७९ वातानुकूलित लोकल फेऱ्यांसह १,३८९ लोकल फेऱ्या रोज धावत आहेत. १५ डब्यांचा विस्तारामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.mumbai-local-news-1-95590874.jpg