FIFA World Cup 2022 : ‘वन लव्ह’ दंडपट्टी वापरण्याच्या निर्णयावरून

in #pusad2 years ago

वृत्तसंस्था, दोहा : फुटबॉलमध्ये सर्वसमावेशकता आणि ‘एलजीबीटीक्यू’ समूहाला पाठिंबा दर्शवण्यासाठी कतार विश्वचषकात ‘वन लव्ह’ दंडपट्टी वापरण्याची इंग्लंड, वेल्स, बेल्जियम, डेन्मार्क, जर्मनी आणि नेदरलँड्स या संघांच्या कर्णधारांनी भूमिका घेतली होती. मात्र, कर्णधारांनी ही दंडपट्टी वापरल्यास त्यांना सामन्याला सुरुवात होताच पिवळे कार्ड दाखवण्यात येईल, असे ‘फिफा’ने स्पष्ट केले. त्यामुळे सहाही फुटबॉल संघटनांनी ‘वन लव्ह’ दंडपट्टी वापरण्याच्या निर्णयावरून माघार घेतली.

‘‘आमच्या कर्णधारांनी ‘वन लव्ह’ दंडपट्टी वापरल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, हे ‘फिफा’ने स्पष्ट केले आहे. आमची आर्थिक दंड भरण्याची तयारी होती. मात्र, कर्णधारांना पिवळे कार्ड मिळण्याचा धोका असल्याने आम्ही ही दंडपट्टी न वापरण्याचे ठरवले आहे. ‘फिफा’च्या निर्णयामुळे आम्ही, आमचे खेळाडू आणि प्रशिक्षक निराश आहेत,’’ असे संयुक्त विधान सहाही फुटबॉल संघटनांनी केले.sp-one-love.jpg