विदेशी गुंतवणूकदारांची कमाईची चाल; १० शेअर्सवर लाखो कोटी गुंतवले, तुमच्याकडे आहेत का?

in #pusad2 years ago

मुंबई: परदेशी गुंतवणूकदार प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा भारतीय बाजारात पैसा ओतत आहेत. अनेक कंपन्यांमध्ये त्यांचा हिस्सा वाढवला आहे. मार्केट रिसर्च कंपनी प्राइम डाटाबेसच्या आकडेवारीवरून विदेशी गुंतवणूकदारांनी (FII) सप्टेंबर तिमाहीत केवळ १० कंपन्यांच्या समभागांमध्ये तब्बल १ लाख कोटी रुपयांची उलाढाल केली आहे, असे दिसून आले. यामध्ये झोमॅटोसह टाटा स्टील, आयटीसी, बजाज फिनसर्व्हसह १० कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे.
FII ने गेल्या तिमाहीत एकूण ७६४ समभागांमध्ये गुंतवणूक केली. यापैकी सर्वाधिक पैसा त्यांनी टाटा स्टीलमध्ये गुंतवला. FII ने या मेटल स्टॉकमध्ये २४,८९८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची प्राइम डेटाबेसमधून ही माहिती मिळाली आहे. FII ने सप्टेंबर तिमाहीत धातू समभागांमध्ये २४४.४२ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. या तिमाहीत आतापर्यंत या समभागात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
यानंतर, FII ने भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्समध्ये २२ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली. परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे लावलेल्या शीर्ष १० समभागांवर एक नजर टाकूया. गेल्या महिनाभरापासून या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय आणखी वाढ अपेक्षित आहे पण सावधगिरीने गुंतवणूक करा कारण परदेशी गुंतवणूकदार कधीही विक्री सुरू करू शकतात.95622689.jpg