विकी कौशलच्या सिनेमात कॉमेडी, सस्पेन्स, अन् मराठीचा तडका; दिसले एकापेक्षा एक मराठमोळे चेहरे

in #pusad2 years ago

मुंबई: अभिनेता विकी कौशलला (Vicky Kaushal Upcoming Movie) तुम्ही आत्तापर्यंत चित्रपटांमध्ये गंभीर भूमिका करताना पाहिलं असेल, पण आता विकी एका कॉमेडी सिनेमात दिसणार आहे. विकीच्या 'गोविंदा नाम मेरा' (Govinda Naam Mera Trailer Release) चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या सिनेमात विकीसह कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Penekar) यांच्या मुख्य भूमिका आहेत. ट्रेलरमध्ये कॉमेडीपासून सस्पेन्सपर्यंत सर्व काही अतिशय मसालेदार पद्धतीने दाखवण्यात आले आहे. सिनेमाच्या ट्रेलरवरुन असे समजते आहे की 'गोविंदा नाम मेरा' हा सिनेमा कॉमेडी टच असणारी मर्डर मिस्ट्री आहे.
सिनेमाचा ट्रेलर जर तुम्ही पाहिला असेल तर एक गोष्ट लक्षात येईल की 'गोविंदा नाम मेरा'मध्ये एकापेक्षा (Marathi Actors in Govinda Naam Mera) एक सरस असे मराठी कलाकार दिसणार आहे. या सिनेमातील मराठी कलाकारांच्या यादीत रेणुका शहाणे, अमेय वाघ, सयाजी शिंदे, तृप्ती खामकर हे आहेत. हे तीनही कलाकार एखाद्या महत्त्वाच्या भूमिकेत या सिनेमात दिसणार आहेत.
सिनेमाच्या कथानकाविषयी बोलायचे झाल्यास विकी कौशल गोविंदाच्या भूमिकेत आहे. भूमी त्याच्या पत्नीच्या तर कियारा त्याच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत आहे. गोविंदा हा एक कोरिओग्राफर असून त्याची पत्नी त्याला सारखी ओरडताना दाखवली आहे. गोविंदाला त्याच्या पत्नीला घटस्फोट द्यायचा असतो, पण ती त्यासाठी त्याच्याकडे २ कोटी रुपये मागते. ट्रेलरमध्ये एक मोठा ट्विस्ट दाखवण्यात आला आहे की यात एक खून होतो. या खूनाचा संशय गोविंदा आणि त्याच्या गर्लफ्रेंडवर येतो. आता नेमका खून कुणाचा होतो? खून होतो की नाही? खून कोण करतं? या सर्व प्रश्नांची उत्तरं सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच समजेल.govinda-naam-mera-95644630.jpg