दिल्ली सरकारची नवीन अट; पीयूसी नसल्यास इंधन नाही Published on : 12 October 2022, 8:32 pm By सकाळ वृत्तसेवा

in #punjab2 years ago

नवी दिल्ली : येत्या २५ ऑक्टोबरपासून पीयूसीसी प्रमाणपत्र असणाऱ्या वाहनांना राजधानीत इंधन मिळणार आहे. यासंदर्भातील आदेश आज दिल्ली सरकारने पेट्रोलपंप धारकांना दिले. प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) वाहतूक शाखेकडून जारी केले जाते. वाहतूक खात्याने यासंदर्भात नोटीस जारी करत इलेक्ट्रिक आणि बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या वगळून एका वर्षापेक्षा जुन्या असलेल्या गाड्या मालकांनी तत्काळ पीयूसी प्रमाणपत्र काढावे, असे निर्देश दिले. वाढते प्रदूषण लक्षात घेता केजरीवाल सरकारने प्रदूषण करणाऱ्या गाड्यांना चाप लावण्यासाठी कडक निर्णय घेतला आहे.

वाहतूक शाखेच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी २५ ऑक्टोबरच्या अगोदर अधिकृत पीयूसीसी प्रमाणपत्र काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिकृत पीयूसीशिवाय गाडी चालविल्यास चालकाला दहा हजार रुपयांचा दंड आणि तीन वर्षाची कैद किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असे नोटिशीत म्हटले आहे. २५ ऑक्टोबरनंतर अधिकृत पीयूसी असलेल्या वाहनांना इंधन विकावे आणि तशी सूचना पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पंपधारकांना देण्यात येत आहेत. आठवडाभरात पीयूसीसी प्रमाणपत्र काढून घेतले नाही तर गाडीची नोंदणी देखील रद्द होऊ शकते, अशी तंबीही देण्यात आली आहे. दिल्लीत ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात हवेचे प्रदूषण गंभीर पातळी गाठते.3W72119s5BjW4PvRk9nXC4LsiTkp4kF69xucQWu2w9s9bLqsM3NJnL1tGSUjSMbGtfWghUt4z9j9v64suLjXRZP5GsCRuWyjyqm1SogGFMVauepuoAgaNS.png