Pune News: पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या, धक्कादायक प्रकार उघड

in #pune2 years ago

bhushan_esakal___2022_10_20T201951_859.pngपुणे: पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालय मध्ये शिकणाऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील लोणी काळभोर मध्ये असलेल्या एम आय टी महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या तरुण जॉर्डन पब्लीसियेस याने महाविद्यालयाच्या संकुलात आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहेमिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी ५ वाजता, हॉस्टेल मध्ये कार्यरत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना जॉर्डनने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. हे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नेमके हे टोकाचे पाऊल त्याने का उचलले हे अद्याप समजू शकलेले नाही. जॉर्डन मूळचा बंगळुरूचा असून डिझाईन विभागात चौथ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. पुढील तपास पोलीस करत आहेत.