Agriculture Update : शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ किलो साखर,दिवाळी भेट

in #pune2 years ago

CPD22B03853.jpgचोपडा : तालुक्यातील बारामती ॲग्रो लि. युनिट क्रमांक चारने मागील वर्षी २०२१-२२ या गाळप हंगामात चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडे तत्त्वावर चालविण्यास घेतल्यानंतर कमी कालावधीत २ लाख ९३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. त्या गाळपात ऊस पुरवठा केलेल्या ३ हजार ७०६ शेतकऱ्यांना बारामती ॲग्रोकडून दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी ५ किलो साखर मोफत घरपोच गटनिहाय वाटप केली जात असल्याची माहिती बारामती ॲग्रोचे युनिट ४ चे जनरल मॅनेजर मिलिंद देशमुख यांनी दिली आहे.बारामती ॲग्रो लि. युनिट क्रमांक ४ भाडेतत्त्वावर घेतल्यानंतर प्रथमच ऊस पुरवठा करणाऱ्या ३ हजार ७०६ शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ किलोप्रमाणे १८५ क्विंटल साखरेचे वाटप घरपोच दिले जात आहे. यासाठी जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातील १७ गटांमध्ये प्रत्येक कर्मचारी ही कामगिरी पार पाडत आहे. गत हंगामात कारखानास ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना काही अडचणींना सामोरे जावे लागले. यावर्षी बारामती ॲग्रोने योग्य ते नियोजन केल्याने कोणतीही अडचण येणार नसून, ठरलेले उद्दिष्ट वेळेत गाठण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी दिली आहे.