पुणे : व्यावसायिक भरभराट, पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरुन पत्नीशी अघोरी कृत्य

in #pune2 years ago


पुणे - अंधश्रद्धा विरोधी प्रकार बंद होण्यासाठी आणि नरबळी, जादूटोणा विरोधी कायदा अस्त्विात येण्यासाठी आयुष्य वेचलेल्या डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन केले जात असतानाच, दुसरीकडे व्यावसायिक पतीने व्यावसायिक वृद्धी व पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरुन पत्नीला सर्वांसमोर आंघोळ करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी सोमवारी व्यावसायिकासह, सासू, सासरे व मांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पती, सासू, सासरे तसेच मांत्रिकाविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार, फसवणूक, नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा पती हा व्यावसायिक असून ते कात्रजजवळील आंबेगाव परिसरात राहतात. 2013 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनीच पती, सासू, सासऱ्यांनी फिर्यादी महिलेस शिवीगाळ, मारहाण करीत तिचा छळ करण्यास सुरुवात केली.

Sort:  

Apki voting power bhut kam hai please ap 2 din tak kisi ki post like na kare taki apko voting power badh Jaye

Is link se ap apni voting power check kar sakte hai 🙏

https://explorer.wortheum.news/#/explorer/@sumitsawale