ठ्ठ्याने तब्बल २३ वर्ष मुंबई लोकलने केला फुकट प्रवास; पण एक चूक झाली अन् सगळा खेळच बिघडला

in #pune2 years ago

. टा. प्रतिनिधी मुंबईः तिकीट तपासणी करताना अनेकदा काही प्रवासी ‘स्टाफ’ असल्याचे सांगतात. त्या प्रवाशांची तिकीट तपासणीस प्रत्येकवेळा खातरजमा करत नाही. याचाच फायदा घेत एक- दोन नव्हे तर तब्बल २३ वर्षे एका नागरिकाने मोफत रेल्वेप्रवास केला आहे. पश्चिम रेल्वेवरील तिकीट तपासणीच्या विशेष भरारी पथकाने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. संबंधित प्रवासी रेल्वेचा कंत्राटदार असून त्यानेच रेल्वेला गंडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे.

mumbai-local-news-1

विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेवर विशेष भरारी पथकाने तिकीट तपासणी मोहीम सुरू केली आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकावर तपासणी करत असताना भरारी पथकातील टी. सी. अब्दुल हजीज अब्दुल हमीद यांनी अमित कुमार पटेलकडे तिकीटाची मागणी केली. पटेलने रेल्वे ‘स्टाफ’ असल्याचे सांगितले. टीसीला संशय आल्याने त्याने ओळखपत्राची मागणी केली. पटेलने सन २०००मध्ये बनवलेले ओळखपत्र दाखवले. हे ओळखपत्र फाटलेल्या व खराब झालेल्या स्थितीत होते. यामुळे टीसीची शंका बळावली. त्याने पटेलकडे ग्रेड पेची विचारणा केली त्यावेळी त्याला उत्तर देता आले नाही. दरम्यान भरारी पथकातील अमित कुमार शर्मा, भावेश पटेल आणि अजय सारस्वत यांनी प्रश्नांचा भडिमार केला असता पटेलने आपण रेल्वे कर्मचारी नसून कंत्राटदार असल्याचे कबूल केले.

पटेल याच्याकडे असलेला पास हा गुजरातमधील कलोल रेल्वे स्थानकातील कर्मचाऱ्याचा आहे. या पासच्या आधारे त्याने बनावट रेल्वे पास तयार केला. त्यावर शिक्का देखील मारण्यात आलेला आहे, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

मेल, एक्स्प्रेसमधूनही फुकट प्रवास

पटेल याने केवळ लोकलमधूनच नव्हे तर मेल-एक्स्प्रेसमधून देखील रेल्वे कर्मचारी असल्याचे सांगून मोफत प्रवास केला आहे, असे चौकशीअंती उघडकीस आलेला आहे. भरारी पथकाने पटेलला चर्चगेट रेल्वे पोलिसांकडे दिले असून त्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलेला असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.

महत्वाचे लेख
पदवी नसतानाही केली १४ वर्षे वकिली; आता वयाच्या ७०व्या वर्षी असं फुटलं बिंग
जवळच्या शहरातील बातम्या
पुणे
नाशिक
ठाणे
नवी मुंबई
महाराष्ट्र टाइम्सवर घ्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स
Follow Us
Install
Follow Us
1.8M+
Likes
443K+
Followers
59.6K+
Subscribers
Marathi NewsMaharashtraMumbai NewsMan Travelling In Local For 23 Years Without Ticket
IMG-20220922-WA0000.jpg