गोविंदा’च्या सातव्या थरावरून ‘माझं बाळ’ कोसळलं तेव्हा…

in #pune2 years ago

सत्यानाश होवो तुमच्या दहीहंडीचा… तुम्ही सगळेजण उंचउंच थरांचं कौतुक करत होतात तेव्हा तुम्हाला मजा यावी म्हणून माझं बाळ सातव्या थरावर चढत होतं. तुमची दोन घटकांची मजा झाली आणि माझ्या बाळाचा जीव गेला! होय, गेलाय त्याचा जीव. सातव्या थरावरून खाली कोसळताना डोक्याला मार लागून माझ्या बाळाचा जीव गेलाय! तुमच्या गोविंदाने माझा बाळकृष्णच हिरावून नेलाय… आता कुठून आणू त्याला परत ? कसं जगू त्याच्याशिवाय?Dahi-Handi-2022.jpeg