Nitin Gadkari : देशातील कोणता पूल कोसळणार? दिल्लीत आधीच वाजणार अलार्म!

in #pune2 years ago

Nitin Gadkari : गुजरातमधील मोरबीमध्ये नुकताच केबल पूल कोसळून १३५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशातील अनेक पुलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मोरबी येथील घटनेनंतर गुजरातमधील वातावरण चांगलेच तापले असून, विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान करत त्यांच्या मेगाप्रोजेक्टबाबत माहिती दिली आहे. हेही वाचा : बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम80 हजार पुलांचा रेकॉर्ड पूर्णएका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी म्हणाले की, 'देशातील 80 हजार पुलांचा रेकॉर्ड एकत्र केला आहे. याशिवाय 3 ते 4 लाख पुलांचा डेटा एकत्र करणे बाकी आहे. नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या या सिस्टिममुळे कमकुवत किंवा कोसळणाऱ्या पूलाबाबत दिल्लीत ठेवलेल्या कंप्यूटरवर अलार्म वाजेल त्यानंतर याबाबत राज्य सरकार आणि कॉर्पोरेशनला पूल सदोष असल्याची माहिती दिली जाईल.