चंद्रकांत खैरेंची नवनीत राणांवर टीका; उद्धव ठाकरेंचा केला होता एकेरी उल्लेख!

in #politics2 years ago

navneet-rana-uddhav-thackeray-chandrakant-khaire.jpgराज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर भाजपा आणि शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा थेट सामना पाहायला मिळत आहे. यात दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. मात्र, अनेकदा दोन्ही बाजूंनी टीका करताना पातळी सोडली जात असल्याचंही दिसून येत आहे. असाच एक प्रकार सध्या घडताना दिसत असून अमरावतीमधील खासदार नवनीत राणा आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी एकमेकांवर केलेली टीका चर्चेचा विषय ठरली आहे. आधी नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्यानंतर त्यावर चंद्रकांत खैरेंनी देखील एकेरी भाषेतच प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा?

जळगावमध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यातर्फे हनुमान चालीसा पठनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी व्यासपीठावरून बोलताना नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. मात्र, टीका करताना राणा यांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवसैनिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत