Youth vote registration : मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम

in #parbhani2 years ago


ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Youth vote registration : मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम
Published on : 10 November 2022, 12:12 am

By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे जिल्ह्यात महिलांसह युवा मतदारांची संख्या वाढवण्यासाठी आता १७ वर्षाच्या युवा-युवतींना मतदान नोंदणी करता येणार असून जिल्ह्यात ९ नोहेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत विशेष मतदार नोंदणी मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. ठाणे जिल्ह्यात ६१ लाख ३४ हजार ९५५ मतदारांची १०० टक्के छायाचित्रे असून महिला मतदार नोंदणीमध्ये पाच टक्क्यांनी वाढ झालेली आहे. राज्यात तृतीय पंथीयांची ८५३ एवढी सर्वाधिक मतदार नोंदणी झाली आहे. यामध्ये ३३ लाख २८ हजार ९ पुरुष मतदार असून २८ लाख ६ हजार ९३ महिला मतदार आहेत. मतदार यादीत लिंग गुणोत्तरामध्ये महिलांची नोंदणी ०. ५ने वाढली आहे, म्हणजे ८३८ वरून ८४३ झाली आहे.तसेच युवा मतदारांसाठी एक सहायक नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आला असून हा आधिकारी कॉलेजमध्ये १७ वर्षीय विद्यार्थांनावर विशेष लक्ष देणार आहे. १ जानेवारी ही मतदार नोंदणीची तारीख निश्चित करण्यात आली असून, ज्या मतदाराला सप्टेंबर पर्यंत १८ वर्ष पूर्ण होतील, त्यांना आता मतदार नोंदणी करता येईल. मात्र १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांचे नाव मतदार यादीत येईल, असे शिनगारे यांनी सांगितले.शिबिरांचे आयोजनदरम्यान, १९ आणि २० नोव्हेंबर आणि ३ व ४ डिसेंबर या दिवशी राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहेत. महिला व दिव्यांग यांच्या नाव नोंदणीसाठी १२ व १३ नोव्हेंबर आणि २६ व २७ नोव्हेंबर रोजी तृतीय पंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला आणि घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीसाठी शिबीर होईल, असे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी स्पष्ट केले.