अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन

in #parbhani2 years ago

अकोले | प्रतिनिधी

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध मागण्यांसाठी अकोले पंचायत समिती वर अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येऊन तीव्र निदर्शने करण्यात आली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी रात्र -दिवस बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संपूर्ण राज्यात अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलने होत असुन त्याचाच भाग म्हणून एकात्मिक महिला व बालकल्याण विभाग, अकोले व राजुर प्रकल्पांतर्गत असलेल्या सर्व अंगणवाडी कर्मचारी यांनी पंचायत समितीवर मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली.

अंगणवाडी कर्मचारी ताईंना प्रलंबित मानधनवाढ तातडीने लागू करा, ग्रॅज्युइटी (Gratuity) व पोषण ट्रॅकर ऍप बाबद सर्वोच्च न्यालयाच्या आदेशाचे पालन करून अंगणवाडी कर्मचारी ताईंना त्याचा लाभ व्हावा यासाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करा, सर्वांना नवीन मोबाईल व मोबाईलमध्ये मराठी ऍप तसेच मोबाईल देखभाल खर्च तातडीने द्या, सर्व अंगणवाडी कर्मचारी ताईंसाठी मासिक पेन्शन द्या, सर्व सेवा निवृत्त अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे प्रलंबित निवृत्ती मानधन/पेन्शन तातडीने अदा करा, मिनी अंगणवाडी ताईना पुर्ण अंगणवाडीचा दर्जा लागू करा, मदतनिसांना सेविका पदी बढती बाबत निकष सोपे सरल करा, पात्र सेविकांची मोठ्या प्रमाणावर सुपरवायझरपदी भरतीची व बडती करा, किरकोळ आहाराच्या दरात वाढ करा, खर्चाची रक्कम दहा हजारपये मंजूर करा, सेवाज्येष्ठते प्रमाणे मानधनात वाढ लागू करा, दुर्गम भागातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बंद झालेला भत्ता पुन्हा सुरू करा,

अनेक अंगणवाडी ताईंचे गहाळ मानधन तातडीने अदा करा, निकृष्ठ व बेचव आहार पंचनामा करून पुरवठ्या बाबद तातडीने चौकशी करा व दोषींवर कारवाई करा, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अंगणवाडी इमारतीची नवीन बांधणी, दुरूस्ती साठी तातडीने उपाययोजना करा, एकात्मिक महिला व बालकल्याण विभाग, अकोले कार्यालयाकडून फसवणूक करून अन्याय झालेल्या शिवाजीनगर अंगणवाडी ताई श्रीमती अनिता धुमाळ यांच्या प्रकरणाची चौकशी करा व दोषींवर कार्यवाही करा, अंगणवाडी ताईंना आरोग्याच्या सोईनसह संपूर्ण कुटुंबाला मोफत 5 लाखाचा आरोग्य विमा लागू करा,थकीत प्रवास भत्ता, इंधन खर्च, अमृत आहार खर्च व थकीत बिल तसेच इतर देणे तातडीन अदा करा, व या सर्व खर्चासाठी आगाऊ रक्कम अंगणवाडी कर्मचारी ताईंना द्या,आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.व तीव्र निदर्शने करण्यात आली.मागण्या मान्य होई पर्यंत रात्र-दिवस हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू राहणार असल्याचे माकप नेते डॉ अजित नवले यांनी सांगितले.