Government Job : वैज्ञानिक पदावर सरकारी नोकरीची संधी; आजच करा अर्ज...

in #parbhani2 years ago

मुंबई : नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) ने वैज्ञानिक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीद्वारे वैज्ञानिक C, D, E, F च्या एकूण 127 रिक्त जागा भरल्या जातील. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असलेले सर्व उमेदवार calicut.nielit.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे.