Bhaskar Jadhav: संताजी-धनाजींचा अर्थ कळतो का? भास्कर जाधवांचा बावनकुळेंना संतप्त सवाल

in #parbhani2 years ago

बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना संताजी-धनाजीची उपमा दिल्याने संताजी-धनाजींचा अर्थ कळतो का? असा संतप्त सवाल भास्कर जाधव यांनी केला आहे.गुहागर मतदारसंघातील वस‌ई विरार क्षेत्रातील रहिवासी व स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी आणी शिवसैनीकांचा संयुक्त जाहिर मेळावा नालासोपारा पूर्व येथे शनिवारी संध्याकाळी संपन्न झाला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.Sunday, November 13, 2022
AMP

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Bhaskar Jadhav: संताजी-धनाजींचा अर्थ कळतो का? भास्कर जाधवांचा बावनकुळेंना संतप्त सवाल
Published on : 13 November 2022, 3:23 am

By
टीम ईसकाळ टीम

बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना संताजी-धनाजीची उपमा दिल्याने संताजी-धनाजींचा अर्थ कळतो का? असा संतप्त सवाल भास्कर जाधव यांनी केला आहे. (shivsena Bhaskar Jadhav Chandrashekhar Bawankule Devendra Fadnavis maharashtra politics crisis )

गुहागर मतदारसंघातील वस‌ई विरार क्षेत्रातील रहिवासी व स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी आणी शिवसैनीकांचा संयुक्त जाहिर मेळावा नालासोपारा पूर्व येथे शनिवारी संध्याकाळी संपन्न झाला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

काय म्हणाले जाधव? भास्कर जाधव यांना विचारलं असता त्यांनी बावनकुळेंना उपरोधात्मक टोला लगावला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना पकडल्यानंतर 27 वर्षे महाराजांच्या मावळ्यांनी मराठ्यांच्या स्वराज्याचे रक्षण केले. मोघलांच्या गादीचा कळस कापून आणला त्यात अग्रगण्य संताजी आणि धनाजी हे होते. पण आपल्या राज्यात तर आपल्याच सत्तेला पाय उतार करणारे शिंदे आणि फडणवीस कसे संताजी धनाजी? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.त्यांच्या या प्रश्नाला बावनकुळे काय उत्तर देणार हे पाहणे उस्तुकत्याचे ठरणार आहे. तसेच, शिंदे गटातील 40 आमदार स्थिर राहू नये, यासाठी स्वत: भाजप प्रयत्न करत आहे. भाजपच शिंदे गटाला सुरुंग लावणार असल्याचा थेट आरोप शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केला आहे.