भारतात मोबाईल नंबरच्या आधी +91 का आहे? हा कोड कोणी दिला, तुम्हाला माहित आहे का...

in #parbhani2 years ago

91 country code: +91 हा एक कोड आहे जो कोणत्याही भारतीय फोन नंबरच्या आधी दिसतो. भारतात कोणताही मोबाईल नंबर डायल करताना हा कोड वापरावा लागतो. हा कोड लोकल किंवा एसटीडी कॉलमध्ये आपोआप जोडलेला असतो. तरी आंतरराष्ट्रीय कॉल दरम्यान हा कोड बदलतो. हा कोड का दिसतो आणि हा नंबर का येतो याचा तुम्ही विचार केला आहे का?Knowledge News in Marathi : आजकाल मोबाईलचा (Mobile) सर्वजण वापर करतात. मात्र जेव्हा आपण एखाद्याला कॉल (calling) करतो किंवा कोणीतरी आपल्याला कॉल करतो तेव्हा आपण पाहतो की मोबाइल नंबरच्या (contact number) सुरूवातीला +91 आहे. तुम्ही कधीही विचार केला आहे का की कोणत्याही फोन नंबरच्या (phone number) आधी +91 का लिहिले जाते? कारण हा देश कोड (country code) आहे आणि भारताचा देश (Indian Code) कोड +91 आहे. पण फक्त +91 का? इतर देशाचा कोड का दिला नाही. त्याचबरोबर भारताला हा कंट्री कोड कोणी दिला आणि कोणत्या आधारावर हे ठरवले जाते. तसेच कंट्री कॉलिंग (calling ) कोड कसे ठरवले जातात आणि ते कोण ठरवते? इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन (International Telecommunication Union) म्हणजे काय? इंटरनॅशनल डायरेक्ट डायलिंग (International direct dialing) म्हणजे काय? चला तर मग या सर्वांची माहिती सविस्तर जाणून घेऊया.

इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन म्हणजे काय?

देश कॉलिंग कोड किंवा देश डायल-इन कोड टेलिफोन नंबरच्या प्रीफिक्स वापरले जातात. याच्या मदतीने इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन (ITU) चे सदस्य किंवा या प्रदेशातील टेलिफोन ग्राहक जोडले जाऊ शकतात.

उदाहरणार्थ, भारतासाठी हा कोड +91 आहे. तर पाकिस्तानचा डायल कोड +92 आहे. या कोडना आंतरराष्ट्रीय सदस्य डायलिंग असेही म्हणतात. ITU म्हणजेच इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन ही एक विशेष एजन्सी आहे. जी संयुक्त राष्ट्रांचा भाग आहे.
ही एजन्सी माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानाशी संबंधित समस्यांवर काम करते. 17 मे 1865 रोजी आंतरराष्ट्रीय टेलिग्राफ युनियन म्हणून त्याची स्थापना झाली. त्याचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. एकूण 193 देश या संघाचा भाग आहेत. देशाचा कोड देणे हा त्याच्या कामाचा एक भाग आहे. म्हणजेच या एजन्सीने भारताला +91 कोड दिला आहे.