Maharashtra Rain Alert : विदर्भात अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा; 'या' जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

in #newupdet2 years ago

हवामान खात्याने विदर्भातील अनेक भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, येथील प्रादेशिक हवामान केंद्राने सोमवार आणि मंगळवारी गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदियाच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवार ते बुधवार या कालावधीत विदर्भातील गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता असून या संदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Sort:  

Please like and follow

Yavatmal