विभक्त पतीच्या टिकेनंतर सुषमा अंधारेंची भावनिक पोस्ट, म्हणाल्या सगळे पर्याय हरतील

in #newupdet2 years ago

मुंबईः उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विभक्त पतीचे शिंदे गटात जाण्यावरुन सध्या राजकीय वातावरण तापले आहे. त्यावरुनच सुषमा अंधारे यांच्या विभक्त पतीने त्यांच्या टीका केली आहे. त्यानंतर उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या लहान लेकीचा सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी दुबईला व्याख्यानाला जातानाचा प्रसंग शेअर केला आहे. यावेळी त्यांनी दुबईला जाताना त्यांना सोसावा लागणारा त्रास आणि लेकीला सोडून त्या कशा दुबईला गेल्या याबाबत त्यांनी भावूनपणे पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी लेकीच्या मामाने म्हणजेच त्यांच्या भावाने आपल्या भाचीला कसं सांभाळलं आहे ही गोष्टही त्यांनी शेअर केली आहे.DASE.jpg