एकनाथ शिंदे यांना मोठी ऑफर! म्हणाल्या, ‘राऊत, आव्हाडांविरोधात गुन्हे मागे घ्या, आम्ही तिघ…’

in #newupdet2 years ago

चंदन पूजाधिकारी, नाशिकः संजय राऊत (Sanjay Raut) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावरील गुन्हे मागे घेतल्यास बिनशर्त शिंदे गटात प्रवेश करेन, अशी मोठी ऑफर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आज भाजप महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाची तक्रार केली आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. तर पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत सध्या जामीनावर आहेत. या दोन्ही नेत्यांवरील गुन्हे मागे घेतले तर मी धुमधडाक्यात एकनाथ शिंदे गटात प्रवेश करेन, असं वक्तव्य नाशिकच्या माजी नगरसेविकेने केले आहे. शिवसेना नेत्याने एकनाथ शिंदे यांना अशा आशयाचे उपरोधिक पत्रही पाठवलं आहे.CM-Eknath-Shinde-11.jpg