चक्क गांजा विकण्यासाठी रोजाने ठेवले होते दोघेजण!

in #newupdet2 years ago

41e25f2b_fef9_4cce_882f_3f4403605cc5.jpgऔरंगाबाद : एका गुन्ह्यात अटक झाल्यानंतर जामीन मिळविण्यासाठी खर्च झाला, त्यासाठी घेतलेले कर्ज वाढत गेले, त्यामुळे त्याने खर्चाचा भार उचलण्यासाठी चक्क गांजा विक्रीचा फंडा सुरू केला, इतकेच नव्हे तर चक्क गांजा विक्रीसाठी दोघेजण रोजंदारीवर कामाला ठेवल्याचा प्रकार समोर आला. या त्रिकुटाला पोलिस आयुक्तालयाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एनडीपीएस सेल) बेड्या ठोकल्या आहेत. सचिन राजू ठोंबरे (२९, रा. पोलिस मित्र कॉलनी, शास्त्रीनगर) असे मास्टरमाइंडचे नाव असून सुरेश भगवान उंबरकर (२५, रा. शास्त्रीनगर) आणि विनय संतोष सरोदे (२२, रा. शिवशंकर कॉलनी, गल्ली क्रमांक दोन, मिस्त्री गल्ली) असे त्या दोघा साथीदारांची नावे आहेत.
एनडीपीएस सेलचे सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन मंदिर परिसरातील एका रुग्णालय परिसरातील हातगाडीजवळ तिघांनी गांजा आणल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून एपीआय घुगे यांनी पथकासह सदर ठिकाणी धाव घेतली. संशयितांच्या ताब्यातून एका दुचाकीसह पाच किलो ११ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त अपर्णा गीते, सहायक आयुक्त विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे, सहायक फौजदार नसीम खान शब्बीर खान, विशाल सोनवणे, महेश उगले, धर्मराज गायकवाड, सुरेश भिसे, दत्ता दुभळकर, प्राजक्ता वाघमारे यांच्या पथकाने केली.
RECOMMENDED ARTICLES
शहरात गांजा विक्री, नशेच्या गोळ्या विक्री यासारख्या प्रकारावर एनडीपीएस सेलची करडी नजर असणार आहे. आरोपी सचिनसारखे नग शहरात अनेक ठिकाणी असण्याची शक्यता असून याच्या मुळापर्यंत जाऊन कारवाईचा धडाका सुरूच राहणार आहे, तसे आदेशच आम्हाला पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिले आहेत.- हरेश्वर घुरे,सहायक पोलिस निरीक्षक, एनडीपीएस सेल, पोलिस आयुक्तालय.