घराबाहेर पावासाचा राडा, रस्त्यावर खड्डे अन चिखलाचा सडा

in #newupdet2 years ago

वाकड - वाकड फाटा ते वाकड पोलिस ठाणे ह्या अवघ्या सहाशे मिटर रस्त्याचे काम दोन वर्षे संपत आले तरीही अतिशय संथ गतीने आणि ठेकेदाराच्या सोयीनुसार सुरू आहे. हा रस्ता जागोजागी खोदण्यात आला आहे त्यातच दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे ह्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सर्वत्र खड्डे, चिखल अन राडारोडा पसरल्याने वाहनचालक व नागरिकांना मोठ्या मनः स्तापाला सामोरे जावे लागत आहे.या रस्त्यावरील शिव कॉलनी चौकात अतिशय वर्दळीच्या ठिकाणी हा रस्ता मंगळवारी खोदण्यात आला. त्यातच शिव कॉलनी कमानी समोरील पोलीस ठाण्यापर्यंतची एक लेन तीन महिन्यापासून पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर दुसऱ्या लेनवर प्रचंड खड्डे, पाणी, खडी, चिखल पसरल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. एकच लेन सुरू वाहतूक कोंडी होत आहे तर परिसरातील नागतिकांना येजा करणे जिकिरीचे बनले आहे.1.jpg