सूर्यकुमार दुसऱ्या स्थानावर कायम

in #newupdet2 years ago

दुबई : भारतीय क्रिकेट संघाने मागील सात टी-२० मालिकांमध्ये पराभव पाहिलेला नाही. यापैकी सहा मालिका जिंकण्यात या संघाला यश प्राप्त झाले आहे अन्‌ याच कारणामुळे भारतीय संघ आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे. याचसह टी-२० क्रिकेटमध्ये जबरदस्त फलंदाजी करीत भारतासाठी मोलाची कामगिरी बजावणारा सूर्यकुमार यादव हाही फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर कायम आहे. श्रेयस अय्यरने २५ व्या स्थानावरून १९ व्या स्थानावर मुसंडी मारली आहे. इशान किशन व रोहित शर्मा अनुक्रमे १५व्या व १६व्या स्थानावर आहेत.bhushan_esakal___2022_08_06T124407_910.jpgटी-२० क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम पहिल्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तसेच अफगाणिस्तानचा खेळाडू मोहम्मद नाबी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.