मुसळधार पाऊस अन् पाकिस्तानी युद्धनौका भारतीय समुद्रात घुसली; गुजरातच्या सीमेवरून हुसकावले

in #newupdet2 years ago

एकीकडे चीन आपली संशोधक युद्धनौका भारतापासून अगदी जवळ श्रीलंकेमध्ये आणू पाहत असताना दुसरीकडे भारताचा आणखी एक शत्रू पाकिस्तानही कुरापती काढू लागला आहे. जुलै महिन्यात जेव्हा मान्सून कोसळत होता तेव्हा पाकिस्तानी युद्धनौका संधीचा फायदा घेण्यासाठी भारताच्या समुद्री हद्दीत घुसली होती.

एनआयएने सरकारी सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. यावेळी भारतीय तटरक्षक दलाने डॉर्निअर टेहळणी विमानाच्या मदतीने भारतीय समुद्रातून हुसकावून लावले. पाकिस्तानी नौदलाचे जहाज आलमगीर सीमा ओलांडून भारतीय पाण्यात घुसले.

आलमगीरने भारतीय पाण्यात प्रवेश केल्यानंतर लगेचच भारतीय तटरक्षक दलाच्या डॉर्नियर विमानाने त्याचा शोध घेतला. ते जवळच्या विमानतळावरून सागरी टेहळणीसाठी निघाले होते. पाकिस्तानी युद्धनौकेचा शोध घेतल्यानंतर, डॉर्नियरने आपल्या कमांड सेंटरला भारतीय जलक्षेत्रात उपस्थितीची माहिती दिली आणि त्यावर लक्ष ठेवले.

सूत्रांनी सांगितले की डॉर्नियरने पाकिस्तानी युद्धनौकेला इशारा दिला व भारतीय हद्दीतून परत जाण्यास सांगितले. परंतू त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर डॉर्नियर विमानाने आलमगीरवरून दोन-तीन वेळा उड्डाण केले. यानंतर पाकिस्तानी युद्धनौका माघारी परतली. e95toguehdtljbh_202208864039.jpge95toguehdtljbh_202208864039.jpg

Sort:  

😲😲