धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडूनच वारंवार बलात्का

in #newupdet2 years ago

esakal_new (1).jpgपुणे : पुण्यात शेजाऱ्याकडूनच एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आरोपीने पीडितेचे अपहरण करून मुंबईला ठेवल्याचीही बाब उघड झाली असून पोलिसांना नराधमाला अटक करत त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime News)पुण्यातील गुलटेकडी परिसरातून ही घटना उघडकीस आली आहे. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने १५ वर्षाच्या मुलीला धमकावत वारंवार बलात्कार केला आहे. ही बाब जेव्हा मुलीच्या वडिलांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली होती. त्यानंतर पोलिसांना आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.