कसा वाटला शाहरुख?' काय म्हणाली ब्रम्हास्त्रची 'जुनून'?

in #newupdet2 years ago

ब्रम्हास्त्र सध्या टॉपला आहे. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसादही मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं मोठी कमाई केली आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका असलेल्या (Bollywood Actress) ब्रम्हास्त्रचे बजेट 400 कोटींचे होते. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटानं प्रेक्षकांना वेड लावले आहे. यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, (Bramhastra movie) टॉलीवूडचा सुपरस्टार नागार्जुन आणि बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान यांच्याही प्रमुख भूमिका आहे.आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या मौनीला ब्रम्हास्त्रमध्ये एक महत्वाची भूमिका मिळाली होती. तिनं त्यात जुनूनची भूमिका प्रभावीपणे साकारली आहे. सध्या सोशल मीडियावर तिचं कौतूक होताना दिसतंय. प्रेक्षकांना मौनीची ती भूमिका कमालीची आवडली आहे. मौनीनं स्पॉटबॉयला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ब्रम्हास्त्र आणि त्याच्याशी संबंधित काही गोष्टींविषयीच्या आठवणी शेयर केल्या आहेत. मौनी म्हणते, अयाननं मला संधी देणं हीच मोठी गोष्ट आहे. त्यासाठी मी त्याची आभारी आहे.मौनीनं या चित्रपटामध्ये शाहरुखसोबत काम केलं आहे. त्याविषयी तिला विचारले असता, ती भावूक झाली. ज्या अभिनेत्याचे चित्रपट पाहत लहानाची मोठी झाले त्याच्यासोबत काम करण्याचा आनंद मोठा आहे. शाहरुखची मी मोठी फॅन आहे. त्याच्यासोबत काम करताना मला जादुई वाटत होतं. आपण ज्याला पडद्यावर पाहिलं. त्याच्या स्टाईलचे फॅन झालो आज त्याच्यासोबत काम हे मला एखाद्या स्वप्नासारखे वाटत होते. ज्यावेळी मी पहिल्यांदा त्याच्यासमोर गेले तेव्हा मला खूप भीती वाटली होती. एवढा मोठा कलाकार त्याच्याविषयी मनात थोडी भीती होती.शुटचा पहिला दिवस मी थोडी नर्व्हस होते. याचे कारण थेट शाहरुख समोर माझी होणारी इंट्री. मात्र त्यानेच मला समजून घेतले. चर्चा करत टेन्शन दूर केले. हे सगळं माझ्यासाठी जादुई होतं. अशी भावना मौनीनं यावेळी व्यक्त केली. शाहरुखनं ब्रम्हास्त्रच्या पहिल्या भागामध्ये मोहन नावाच्या एका शास्त्रज्ञाची भूमिका केली आहे.