बेबी पावडर कंपनीचा राज्यातील परवाना कायमस्वरुपी रद्द

in #newupdet2 years ago

जॉन्सन अँड जॉन्सन या लहान मुलांच्या पावडर कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली असून यां कंपनीचा महाराष्ट्र राज्यातील परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. या पावडरच्या वापरामुळे लहान मुलांच्या त्वचेस हानी पोहोचत असल्यामुळे प्रशासनाने मुलुंड आणि मुंबई येथील कारखान्यावर ही कारवाई केली आहे.(अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत सदर कंपनीच्या उत्पादनाचा सामू (PH) हा प्रमाणित मानकानुसार न आढळल्यामुळे लहान मुलांच्या त्वचेस हानी पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान, या पावडरमुळे अनेक महिलांनी याविरोधात आरोग्याबाबत तक्रारी केल्या होत्या. ही पावडर वापरल्यामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाच्या समस्या अनेक महिलांध्ये आढळून आल्या होत्या. त्याचबरोबर यामध्ये कॅन्सर निर्माण करणारे घटक असल्याचा दावाही काही अमेरिकन नियामकांनी केला होता. मात्र हे आरोप कंपनीने फेटाळून लावले होते. तसेच कंपनीच्या विरोधात सध्या तब्बल 38,000 केसेस चालू आहेत.जॉन्सन अँड जॉन्सन या पावडरच्या नवजात बालकांसाठी वापर केला जातो पण त्यांच्या उत्पादन प्रक्रियेत दोष आढळल्यामुळे ही प्रशासनाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली असून यानंतर या पावडरचे महाराष्ट्रातील उत्पादन थांबणार आहे. दरम्यान, या कंपनीने मागच्याच महिन्यात, २०२३ पासून जागतिक पातळीवर या पावडरची विक्री थांबवणार असल्याची घोषणा केली होती. त्याआधी या कंपनीने मागच्या वर्षात कॅनडा आणि अमेरिकेत या बेबी पावडरची विक्री थांबवली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रातील मुंबई, मुलुंड येथील कारखान्यावर कारवाई करत परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत.