टोमॅटो फ्लू SARS-CoV-2, मंकीपॉक्स, डेंग्यू किंवा चिकनगुनियाशी अजिबात संबंधित नाही, केंद्र.

in #news2 years ago

0ECA5A6B-5D26-4F86-9596-FB6BA0E197D0-380x214-1.jpegटोमॅटो फ्लूचा विषाणू इतर व्हायरल इन्फेक्शन्स (ताप, थकवा, अंगदुखी आणि त्वचेवर पुरळ) सारखीच लक्षणे दाखवतो. हा विषाणू SARS-CoV-2, मंकीपॉक्स, डेंग्यू किंवा चिकनगुनियाशी अजिबात संबंधित नाही
देशात टोमॅटो फ्लूची (Tomato Flu) 82 हून अधिक प्रकरणे आढळून आल्याने केंद्राने (Central Govt) मंगळवारी राज्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. विषाणूजन्य आजारावर उपचार करण्यासाठी कोणतेही विशिष्ट औषध नाही यावरही त्यात भर देण्यात आला आहे. हा रोग, हात, पाय आणि तोंड रोग (HFMD) चे एक प्रकार, प्रामुख्याने 10 वर्षांखालील मुलांमध्ये दिसून येते. पण हे प्रौढांमध्ये देखील होऊ शकते. केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या अॅडव्हायझरीमध्ये असे म्हटले आहे की, मुलांना या आजाराची लक्षणे आणि दुष्परिणामांविषयी शिक्षित केले पाहिजे. तथापि, टोमॅटो फ्लूचा विषाणू इतर व्हायरल इन्फेक्शन्स (ताप, थकवा, अंगदुखी आणि त्वचेवर पुरळ) सारखीच लक्षणे दाखवतो. हा विषाणू SARS-CoV-2, मंकीपॉक्स, डेंग्यू किंवा चिकनगुनियाशी अजिबात संबंधित नाही.
वर्षी 6 मे रोजी केरळमधील कोल्लम जिल्ह्यात टोमॅटो फ्लूचा पहिला रुग्ण आढळून आला होता आणि 26 जुलैपर्यंत स्थानिक सरकारी रुग्णालयांमध्ये पाच वर्षांखालील 82 हून अधिक मुलांमध्ये हा संसर्ग आढळून आला आहे. केरळमधील आंचल, आर्यनकावू आणि नेदुवाथुर हे इतर प्रभावित क्षेत्र आहेत. या स्थानिक विषाणूजन्य आजाराने शेजारील तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याव्यतिरिक्त, भुवनेश्वरमधील प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्राने 26 मुलांमध्ये (एक ते नऊ वर्षे वयोगटातील) या आजाराची नोंद केली आहे. केरळ, तामिळनाडू, हरियाणा आणि ओडिशा व्यतिरिक्त, भारतातील इतर कोणत्याही राज्यात या आजाराची नोंद झालेली नाही.

Sort:  

Good news Visit on my profile to sir