इंधन दराबाबत आज तेल कंपन्यांनी घेतला 'हा' मोठा निर्णय; वाचा महत्वाची माहिती

in #news2 years ago

Petrol Price : पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. देशातील सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये आहे. श्री गंगानगरच्या तुलनेत पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 29.39 रुपयांनी स्वस्त आहे, तर डिझेलही (Diesel) 18.50 रुपयांनी स्वस्त आहे.

पोर्ट ब्लेअरमध्ये 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये लिटर आहे.
तेल कंपन्यांकडून आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) एक लिटर पेट्रोलसाठी (Petrol Price) 96.72 रुपये मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र (Maharashtra) आणि मेघालय (Meghalaya) वगळता राजस्थान, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह सर्व राज्यांमध्ये सलग 115 दिवस कोणताही बदल झालेला नाही. क्रूड (Crude Oil) आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रति बॅरल $ 93.94 वर आले आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती सध्या कमी आहेत. तेलाचे दर 100 डॉलरच्या आत आहेत. याआधी काही दिवसांपूर्वी कच्चे तेल 100 डॉलरच्याही पुढे गेले होते. त्यावेळी सुद्धा तेल कंपन्यांनी इंधन दरवाढ केली नव्हती. आताही कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असताना दरवाढ झालेली नाही. तसे पाहिले तर कंपन्यांनी आधीच इंधनाच्या किंमती भरमसाठ वाढविल्या आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आजही देशात अनेक ठिकाणी एक लिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांपेक्षा जास्त आहेत.

Loading...

Today Petrol Price: आज 'इतकी' वाढ झालीय भावात; वाचा इंधनविषयी महत्वाची माहिती5bf3d8df66ec03134336a13800db36022831e8f7658adc73d5c9446f5a02e652.webp