मोबाईल फोन महागणार, डिस्प्लेवरील कस्टम ड्युटी वाढली

in #news2 years ago

esakal_new__44_.jpgमोबाइल फोन खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. पुढील काही दिवसात मोबाइल फोनच्या किमतींमध्ये वाढ झालेली दिसून येईल. Apex Indirect Tax of India ने आदेश जारी केला आहे. त्यात नमूद केले आहे की इनपुटच्या आधारे मोबाइल फोनवर उच्च सीमा शुल्क आकारले जाईल.
फोनमध्ये वापरल्या जाणार्‍या घटकांवर जास्त शुल्क आकारले गेले तर मोबाईल कंपन्या त्याची किंमत वाढवू शकतात. यामुळे ग्राहकांना अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, बॅक सपोर्ट फ्रेमसह स्मार्टफोनच्या डिस्प्ले असेंबलीवर 10% बेसिक कस्टम ड्युटी लागू होईल.सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टैक्सेस और कस्टम्स अर्थात CBIC ने म्हटले आहे की, अँटेना पिन, पॉवर की आणि इतर घटक डिस्प्लेसोबत एकत्र केले तर कस्टम ड्युटी चार्ज 5 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. यासह, एकूण शुल्क 15 टक्क्यांपर्यंत असू शकते.
CBIC ने सांगितले की सिम ट्रे, अँटेना पिन, स्पीकर नेट, पॉवर की, स्लाइडर स्विच, बॅटरी कंपार्टमेंट, व्हॉल्यूम, पॉवर, सेन्सर, स्पीकर, फिंगरप्रिंट आणि इतर कोणत्याही गोष्टीसाठी फ्लेक्सिबल प्रिंटेड सर्किट (एफपीसी) जे डिस्प्ले असेंबली मध्ये बसते. संपूर्ण असेंबली 15 टक्के बीसीडी दर आकर्षित करेल. हे शुल्क मेटल/प्लास्टिक बॅक सपोर्ट फ्रेमसह किंवा त्याशिवाय आकारले जाईल. Vivo आणि Oppo सारख्या चिनी कंपन्यांवर कर चुकवल्याचा आरोप होत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. सेल्युलर फोनच्या अत्यावश्यक घटकांवरील कस्टम ड्युटी शुल्काबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने हे घडल्याचा दावा टेक कंपन्या करत आहेत.CBIC ने म्हटले आहे की डिस्प्ले असेंबलीमध्ये अतिरिक्त घटक असल्यास ते नोटीसचे उल्लंघन मानले जाईल. दुसरीकडे उद्योग असे म्हणत आहे की, मोबाइल डिस्प्लेसोबत जोडलेले सर्व घटक डिस्प्ले असेंबलीचा भाग मानले जावेत. त्यामुळे कस्टम ड्युटी 10% पेक्षा जास्त नसावी

Sort:  

Good news Visit on my profile to sir