5 सेकंद अन् पुण्यातला चांदणी चौकातला पूल झाला जमीनदोस्त, पहिला VIDEO

in #news2 years ago

पुणे, 02 ऑक्टोबर : पुणेकरांची कोंडी करणारा चांदणी चौकातला पूल अखेर जमीनदोस्त झाला आहे. पहाटेच्या सुमारास स्फोटकांच्या साह्याने अवघ्या 5 सेकंदामध्ये पूल पाडण्यात आला आहे.

पूलाचा राडारोडा हटवण्याचे काम सुरू असून सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूक सुरू होणार आहे. चांदणी चौकातील पूल पाडण्याची मोहिम अखेर फत्ते झाली. रात्रीपासून वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर २.३३ वाजेच्या सुमारास पूल स्फोटकांनी पाडण्यात आला.

पुल पाडण्यात आम्ही १०० टक्के यशस्वी झालो आहोत. आम्ही ब्लास्ट केला त्याचा आम्हाला फायदा झाला. आम्ही मुद्दाम काही भाग ब्लास्ट होणार नाहीत यासाठी सोडले होते. या पद्धतीला fragmentation असं म्हणतात जे पद्धत twin टॉवर पाडण्यासाठी वापरण्यात आली होती त्याला impulsive ब्लास्टिंग असं म्हणले जाते.

सकाळी ८ च्या आधीच आमचे काम पूर्ण होईल, असा विश्वास एडीफिस इंजिनिअरिंग कंपनीचे पार्टनर उत्कर्ष गुप्ता यांनी व्यक्त केला. तर, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व प्रक्रिया पार पडली. ते स्वत: नियंत्रण कक्षात बसून होते.

असा पाडला पूल पूल पाडण्यासाठी त्याला दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण 35 मिमी व्यासाचे 1 हजार 300 छिद्र पाडण्यात आले होते. 600 किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग करण्यात आला होता. 1 हजार 350 डिटोनेटरचा उपयोग नियंत्रीत पद्धतीने ब्लास्ट करण्यासाठी करण्यात आली होती. ब्लास्ट एक्स्पर्ट आनंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम फत्ते करण्यात आली.214e69e593ee441b148f5bc6070a252b4e0c0ebf82b40cbd785363a2b010a185.webp