राज्यात 'लम्पी'नं शेतकरी त्रस्त, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

in #news2 years ago

मुंबई : राज्यात जनावरांना लम्पी (Lumpy Skin Diseas) आजाराची लागण होत असल्यानं मुंबई महापालिकेकडूनही (Mumbai Municipal Corporation) खबरदारी घेतली जातेय. मुंबईभरातील सर्वच गोशाळा, तबेले, गोठयांची तपासणी करण्याचा निर्णय बीएमसीनं (BMC) घेतलाय.

यामध्ये जनावरांमध्ये लक्षणांची तपासणी करण्यात येणार असून अस्वच्छता आढळल्यास संबंधितांना नोटीस बजावण्यात येणारेय. मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णसंख्या पूर्ण आटोक्यात आली असताना गोवंशीय जनावरांमध्ये लागण वाढलेल्या 'लम्पी' आजारानं भीती निर्माण केलीय.

राज्यातल्या शेतक-यांपुढे उभ्या ठाकलेल्या लम्पी आजाराच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Chief Minister Eknath Shinde) मोठी घोषणा केली आहे. लम्पीमुळे दगावलेल्या गुरांसाठी मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली आहे. ही मदत देताना NDRFचे निकष लावले जाणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत (cabinet meeting) हा निर्णय घेतला गेल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

साताऱ्यात 'लम्पी'चा वाढचता धोका
सातारा जिल्ह्यातील शेतक-याच्या पशुधनाचा लम्पी या संसर्गजन्य रोगानं बळी घेतलाय. कराड तालुक्यातील वाघेरी इथले शेतकरी सुलतान पटेल यांच्या खिलार जातीच्या बैलाचा लम्पी आजारानं मृत्यू झालाय. या मृत्यू झालेल्या बैलाचा पंचनामा लवकर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीय. .सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंत 55 जनावरांना लम्पी आजाराची लागण झालीय.

वाशिम जिल्ह्यात लम्पी आजारानं डोकं काढलंय वर
वाशिम जिल्ह्यात लम्पी आजारानं डोकं वर काढलंय. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच जनावरांचा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुढील आदेश येईपर्यंत जिल्ह्यात जनावरांची खरेदी-विक्री (Buying and selling of animals) होणार नाही, असं जिल्हाधिका-यांनी आदेशात म्हटलंय. जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीवरही (Bullock cart race) बंदी घालण्यात आलीय. वाकद आणि खडकी सदार भागातील जनावरांना लम्पीची लागण झाल्यानं पशुपालक चिंतेत आहेत. e86bfe3443266e5d44b0c914dd4c0e6b426b2ea9962b50ddaf760a2cd3b83a69.webp