Traffic Rules Penalty : बेशिस्त वाहनचालकांकडून 10 कोटी 13 लाखांचा दंड वसूल

in #news2 years ago

पंचवटी (जि. नाशिक) : नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) बेशिस्त वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून, एकूण ३५ हजार ८७७ वाहनांवर कारवाई करत सुमारे दहा कोटी १३ लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिली.नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२२ पर्यंत एकूण ३५ हजार ८७७ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, रक्कम रुपये दहा कोटी १३ लाख एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. विहित वेग मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांवर राज्यामध्ये सर्वाधिक कारवाई प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिकने केली आहे. त्यामध्ये २०२१- २०२२ मध्ये एकूण (४,५९४) वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. (Traffic Rules Penalty 10 Crore 13 Lakhs fined from unruly drivers Nashik Latest Marathi News)4traffic_20police_3.jpg