SAKAL Exclusive : सावधान! 5G SIM Updateच्या नावाने बसतोय गंडा

in #news2 years ago

प्रसाद लवटे : सकाळ वृत्तसेवानाशिक : देशात आता मोबाईल नेटवर्क क्षेत्रातील जलद मानल्या जाणाऱ्या ५जी सेवा (5G Service) कार्यान्वित होण्याचे वारे वाहू लागले आहे. अनेक दुरसंचार कंपन्यांनी यासंबंधी भाकित केले आहे. ही सेवा वापरण्यासाठी लागणारे ५जी तंत्रज्ञानाचे मोबाईल फोन बाजारात उपलब्ध झाले आहे. अद्याप मात्र ही सेवा सुरु झालेली नाही. तरी या भाकितांचा फायदा भामटे घेत आहेत. देशभरात सामान्यांना ५जी सुविधेचा लाभ घेण्यासाठी सिम अपग्रेडेशनच्या (SIM Upgradation) नावाखाली मोठे गंडे बसू लागले आहे. देशात कार्यान्वित दुरसंचार कंपन्यांनी नेटवर्क क्षेत्रात अति जलद अशी ५ जी सेवा सुरु करण्याचे भाकित केले आहे. त्यानुसार देशात ५ जी सेवेचे जाळेही विणले जात आहे, मात्र प्रत्यक्षात ही सेवा सुरु झालेली नाही. मात्र समाजमाध्यमांवर (Social Media) ही सेवा कार्यान्वित झाल्याच्या अफवा येवू लागल्याने सामान्यांनाही ५जी सेवेचा लाभ घेण्याची ओढ लागली आहे. ग्राहकांमध्ये असलेली ही ओढ अन् उत्सुकता सायबर गुन्हेगारीला पोषक ठरत आहे. (Beware of 5G SIM Update Cyber Crime Fraud Nashik Latest Crime News)Nashik_Esakal__13_.png