Pune Traffic : तर वाहतूक कोंडीत पुणेकर गुदमरून जातील !

in #news2 years ago

पुणे : चांदणी चौक असो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक अथवा जंगली महाराज, फर्ग्युसन, टिळक रस्ता, बाजीराव, शिवाजी, नेहरू, महात्मा गांधी रस्ता..... पुण्यातील कोणत्याही प्रमुख रस्त्याचे नाव घ्या, वाहतूक कोंडी आता नित्याचीच झाली आहे. दिवसेंदिवस तिची तीव्रता वाढती आहे..... यावर उपाय आहे, पण त्याकडे कानाडोळा होत आहे. त्यामुळे पुणेकर या कोंडीत गुदमरून जातील, अशी भयावह स्थिती शहरात निर्माण झाली आहे.Traffic_Jam.jpg