MCA Elections : राष्ट्रवादी-भाजप-शिवसेनेची एमसीए निवडणुकीत 'महायुती'

in #news2 years ago

Mumbai Cricket Association : अनेक दशकांपासून मुंबई क्रिकेट संघटनेची (एमसीए) प्रत्येक निवडणूक राजकीय पार्श्वभूमीवर नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. येत्या २० तारखेला होणारी निवडणूकही याला अपवाद नसेल. उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या आणि राष्ट्रवादी भाजप शिवसेना यांचे नेते एकत्र येऊन निवडणूक लढणार असल्याचेही स्पष्ट झाले.sakal_sports__16_.png