अलमट्टी’ उंचीप्रश्‍नी आंदोलनाची व्याप्ती वाढवणार

in #news2 years ago

सांगली : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास कर्नाटक शासनाला विरोध करण्यासाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन उभारण्याचा निर्धार आज सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाला. येथील ‘कष्टकऱ्यांची दौलत’ कार्यालयात आयोजित बैठकीसाठी महापूर नियंत्रण समितीचे कार्यकर्ते, जलसंपदा विभागातील निवृत्त अधिकारी उपस्थित होते. शासनाने याप्रश्‍नी सकारात्मक कार्यवाही न केल्यास येत्या १० नोव्हेंबरला सांगली-कोल्हापूर जिल्हा बंद ठेवण्याचा निर्धारही करण्यात आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटर करण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्याचे तीव्र पडसाद कोल्हापूर जिल्ह्यात उमटले आहेत. याबाबत सांगलीतील लोकप्रतिनिधींनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही.1almatti_0.jpg