Tata ची छोटी SUV नेक्सॉनवर पडतेय भारी, टियागो-टिगॉरही फेल, एका वर्षात १.१९ लाख लोकांनी केली खरेदी

in #news2 years ago

tata-punch-sale-95267979.jpgदिल्ली : Tata Punch Sale : टाटा मोटर्स कंपनीच्या पंच या छोट्या एसयूव्हीने कंपनीसाठी बूस्टरचं काम केलं आहे. लाँचिंगपासून या मिनी एसयूव्हीची डिमांड कमी होण्याचं नाव घेत नाहीये. कंपनीने लाँचिंगनंतर पहिल्या १० महिन्यात या कारच्या ९४ हजार युनिट्सची विक्री केली होती. ही विक्री अजूनही वाढतच आहे. गेल्या दोन महिन्यात कंपनीने टाटा पंचच्या विक्रीच्या बाबतीत १ लाखाचा आकडा पार केला आहे. पंच ही कार ऑक्टोबर २०२१ मध्ये लाँच करण्यात आली होती. तेव्हापासून गेल्या १२ महिन्यात कंपनीने या कारच्या १,१८,६७७ युनिट्सची विक्री केली आहे. या कारच्या विक्रीसमोर टाटाच्या इतर गाड्या जसे की सफारी, नेक्सॉन, अल्ट्रॉझ, टियागो, टिगॉर मागे पडल्या आहेत. या दिवाळीत देखील टाटा पंचची धडाक्यात विक्री झाली आहे.

कंपनीने अलिकडेच ही कार अपडेट देखील केली आहे. यामध्ये दोन पॉवर विंडो देण्यात आल्या आहेत. तसेच यात मॅन्युअल एसीसाठी नवीन डिझाईन मिळतं. ओआरव्हीएम्सवर टर्न इंडिकेटर, इको मोडही यामध्ये मिळतो. इको मोड कारच्या स्टीअरिंग जवळ आहे. पूर्वी येथे स्टार्ट-स्टॉप फंक्शनॅलिटी फीचरचा स्विच दिला होता, जो आता हटवण्यात आला आहे.

पॉवरफुल इंजिन

टाटा पंच या कारमध्ये १.२ लीटर Revotron इंजिन देण्यात आलं आहे, हे इंजिन ६००० आरपीएमवर ८६ पीएस पॉवर आणि ३३०० आरपीएमवर ११३ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. यामध्ये ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. तसेच यात ५ स्पीड एएमटीचा देखील पर्याय मिळतो. ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह १८.९७ किमी प्रति लीटर आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनह १८.८२ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते.

वाचा : अवघ्या १ लाखात घरी आणा ३२ किमी मायलेज देणारी CNG कार, महिन्याला भरा केवळ इतका EMI

टाटा पंचमधील फीचर्स

टाटा पंच या कारमध्ये