Tata Punch EMI: टाटा पंचसाठी २० टक्के डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI; जाणून घ्या गणित.

in #news2 years ago

tata-puch-emi-10_202211904956.jpgटाटा मोटर्सला नेक्सॉननंतर टाटा पंच या छोट्याशा कारने मोठे यश मिळवून दिले आहे. ही मिनी एसयुव्ही गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच करण्यात आली होती. पहिल्याच महिन्यात या कारची विक्री 8,453 युनिट एवढी झाली होती. वर्षभरात या कारने जवळपास १.१८ लाखांचा टप्पा पार केला आणि ऑटोमोबाईल विश्वात टाटाचा बोलबाला सुरु झाला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तर १२ हजार युनिटपेक्षा जास्त खप नोंदविला. यामुळे ही कार टाटाची बेस्ट सेलिंग कार बनली आहे.