रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात झळकणार शाहरुख खान, प्रोमो आला समोर

in #news2 years ago

shah-rukh-khan-brahmastra.jpegबॉलिवूडमध्ये सध्या नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. आमिर खानचा लाल सिंग चड्ढा आणि अक्षय कुमारचा रक्षाबंधन असे बिग बजेट चित्रपट फ्लॉप झाले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये तयार होणाऱ्या अनेक चित्रपटांना हवे तसे यश मिळवता आलेले नाही. त्यात सोशल मीडियावर बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड पाहायला मिळत आहेत. त्याचा नकारात्मक परिणाम संपूर्ण चित्रपटसृष्टीवर होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अनेक दिग्गजांनी या स्थितीवर भाष्य केले आहे. नुकतंच या चित्रपटातील कलाकारांची नावं समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटात शाहरुख खानही झळकणार असून त्याचा एक प्रोमो समोर आला आहे

Sort:  

Sir please likes my post's