आंबेडकर-ठाकरे युतीला ठाकरे गटाच्या बड्या

in #news2 years ago

prakash-ambedkar-10.jpgऔरंगाबाद: गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे (uddhav thackeray) गटाची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा होत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत (shivsena) युती करण्याची जाहीर इच्छा बोलूनही दाखवली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांची फोनवर चर्चा झाली असून लवकरच त्यांची भेट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडून या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, आता ठाकरे गटातील बड्या नेत्याने या युतीवर प्रतिक्रिया देतानाच या युतीला फुल्ल सपोर्ट केला आहे. त्यामुळे ठाकरे-आंबेडकर यांची जवळीक होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे