ओमप्रकाश : मोस्ट वाँटेड गुन्हेगार ज्यानं 30 वर्षं फरार राहून 28 सिनेमांमध्ये कामही

in #news2 years ago

_126170082_whatsappimage2022-08-02at10.38.20am.jpg.jpegहरियाणाच्या मोस्ट वॉंटेड गुन्हेगारांच्या यादीत नाव असलेला ओमप्रकाश उर्फ पाशा. मागच्या 30 वर्षांपासून आपली ओळख लपवून उत्तरप्रदेशामध्ये राहात होता.

भारतीय सैन्यात सेवा बजावलेल्या या ओमप्रकाशवर दरोडा आणि हत्येचा आरोप होता. मात्र मागच्या 30 वर्षांपूर्वी त्याने हरियाणातून पलायन करून उत्तरप्रदेश गाठलं.

तिथंच आपली नवी ओळख तयार केली, एका स्थानिक महिलेशी लग्नही केलं आणि तीन मुलं सुद्धा जन्माला घातली.

पण या आठवड्याच्या सुरुवातीलाचं वयाची पासष्टी गाठलेल्या या वृद्धाचं नशीब फिरलं.

हरियाणा पोलिसांनी गाझियाबाद शहरातील एका झोपडपट्टीतून त्याला अटक केली.

ही अटक होईपर्यंत त्याने वेगवेगळे व्यवसाय करून पोलिसांपासून लपायचा प्रयत्न केला. त्याने ट्रक चालक म्हणून काम केलं तर कधी धार्मिक प्रसंगी भक्तिगीते गाण्यासाठीच्या ग्रुपमध्ये काम केलं.

एवढंच नाही तर त्याने लो बजेट अशा 28 स्थानिक चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केलाय.

ओमप्रकाश सध्या अटकेत असून त्याच्यावर लावलेल्या आरोपांवर त्याने आपली बाजू मांडलेली नाही.

पण हरियाणाच्या स्पेशल टास्क फोर्सचे (एसटीएफ) उपनिरीक्षक तसेच ओमप्रकाशला अटक करणाऱ्या टीमचा भाग असलेले विवेक कुमार बीबीसीशी बोलताना सांगतात की, 1992 मध्ये झालेल्या खुनात तो सहआरोपी आहे.

ओमप्रकाशच्या अटकेनंतर लगेचच बातम्या आल्या. पण त्याची बाजू काय असेल हे जाणून घेण्यासाठी मी त्याच्या कुटुंबीयांच्या शोधात निघालो.

हरबंस नगरच्या विस्तीर्ण अशा झोपडपट्टीत गोंधळात टाकणाऱ्या अरुंद गल्ल्या आहेत. तिथं घरांना नंबरही नाहीयेत.

या झोपडपट्टीतून ओमप्रकाशचं घर शोधायला मला तब्बल साडेतीन तास लागले.

मी ओमप्रकाशची पत्नी राजकुमारी आणि त्याच्या तीन